Ad will apear here
Next
डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्रे
ब्रिटिशकाळात परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर ठरल्या; मात्र ही भरारी घेण्यासाठी त्यांनी त्या काळी किती कष्ट घेतले, अवहेलना, त्रास भोगला हे काशिबाई कानिटकर यांनी लिहिलेल्या ‘डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्रे’ या चरित्रातून समजते.

गोपाळराव जोशी या विधुर समाजसुधारकाशी तेराव्या वर्षी यमुनाबाई यांचा विवाह झाला आणि त्या आनंदीबाई जोशी झाल्या. गोपाळरावांनी आनंदीबाईंना शिक्षण देण्याचा चंगच बांधला होता. मराठीप्रमाणेच त्यांनी आनंदीबाईंना इंग्रजीचेही शिक्षण दिले. त्यांना शिकणे शक्य व्हावे म्हणून कल्याणहून मुंबई, कोल्हापूर येथे बदली करवून घेतली.

कलकत्ता मुक्कामी मिसेस पी. एफ. कारपेंटर आणि आनंदीबाई यांना झालेला पत्रव्यवहार, डॉक्टर होण्यासाठी आनंदीबाईंचे अमेरिकेत प्रयाण, गोपाळराव व आनंदीबाई यांचा पत्रव्यवहार, अमेरिकेतील त्यांचे वास्तव्य, शिक्षण, स्वदेशात परतण्याची तयारी, त्यांचे आजारपण व त्यात पडलेली मृत्यूशी गाठ ही सर्व माहिती यातून मिळते.

पुस्तक : डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्रे
लेखक : काशिबाई कानिटकर
प्रकाशक : वरदा प्रकाशन
पाने : ३२८
किंमत : ३५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZYWBZ
Similar Posts
छत्रपती शिवाजी महाराज महाप्रतापशाली शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन कृ. अ. केळुसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्रलेखनातून केले आहे. या चरित्राची पहिली आवृत्ती १९०६मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. याची नववी आवृत्ती वाचकांसाठी सध्या उपलब्ध आहे.
सम्राट अशोक चरित्र सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात आपले आधिपत्य निर्माण करून इतिहास अजरामर झालेला सम्राट अशोक हा राजा होऊन गेला. त्याने फक्त राज्यच केले असे नाही, तर त्याने जनतेला धर्मज्ञान, सदाचार, भूतदया या गुणांची शिकवण दिली. प्रजेने या तत्त्वांवर चालावे अशी आशा त्याने केली आणि तसा प्रयत्न आयुष्भर केला.
संपूर्ण पंचतंत्र प्राचीन भारतीय लोककथांचा हा सर्वाधिक लोकप्रिय संग्रह मानला जातो. या संग्रहातील सत्तराहून अधिक लोककथा पाच भागांत विभागल्या आहेत. पंचातंत्रांची रचना शास्त्रविमुख राजपुत्रांना नीतिशास्त्रज्ञ बनविण्यासाठी झाली आहे. मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या पंचातंत्राचा ह. अ. भावे यांनी केलेला हा अनुवाद आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक रा
स्त्रियांसाठी योगा + दातांची सुरक्षा रोजच्या कामांच्या यादीत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला स्त्रियांना वेळ मिळत नाही आणि अखेर वयाबरोबर शारीरिक दुखणी सुरू होतात. ते टाळण्यासाठी घरच्याघरी योगाभ्यास उपयुक्त ठरतो.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language